
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून १३३ महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे रोखलेले प्रवेश पूर्ववत करण्यासाठी महाविद्यालयांकडे २८ जुलैपर्यंत मुदत आहे. २९ जुलै रोजी अधिष्ठाता मंडळाची बैठक होऊन अंतिम निर्णय होईल. त्यातून एकही पाऊल विद्यापीठ मागे हटणार नाही, असे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी स्पष्ट केले.