विद्यापीठातील खानावळीच्या कंत्राटात बंडगर घ्यायचा कमिशन; कंत्राटदाराची तक्रार | BAMU

साडेतीन लाखांची फसवणूक केल्याची कंत्राटदाराची तक्रार
BAMU
BAMUSakal

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात १० ते १२ वर्षे खाणावळ चालविणारे कंत्राटदार हे विद्यापीठातील विविध विभागांत होणारे कार्यक्रम, सेमिनारमध्ये जेवणाची सेवा देत होते. ही कामे मिळवून देण्यासाठी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी प्रा. डॉ. अशोक बंडगर हा कमिशन घेत होता. त्याच्या पत्नीनेही नगर जिल्ह्यातील एका खाणावळीचे टेंडर मिळवून दिले. त्यात तीन ते साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचे दोघांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शोभा गणेश कांबळे व त्यांचा मुलगा नीलेश कांबळे हे दोघे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात खाणावळ चालविण्याचे काम करत. कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रा. अशोक बंडगर हा त्यांना विद्यापीठातील विविध कामे मिळवून देत होता. त्यासाठी कमिशनही घ्यायचा. अशोकच्या पत्नीने गृहोद्योगामार्फत २ ऑगस्ट २०२२ रोजी खाणापूर, (ता. अकोले, जि. नगर) येथील आदिवासी मुला-मुलींच्या जेवणाचा मोठा करार केला. तो आम्ही चालवावा, अशी त्यांनी विनंती केली. अनेक वर्षांपासून ओळख असल्यामुळे १ सप्टेंबर २०२२ पासून जेवण देण्यास सुरुवात केली.

BAMU
Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

त्यात बिलाच्या ९५ टक्के रक्कम कांबळे यांना व ५ टक्के रक्कम बंडगरला, असा तोंडी व्यवहार ठरला होता. ४ लाख ९१ हजार रुपयांचे बील त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाले. त्यातील कांबळे यांना केवळ २ लाख १० हजार रुपये दिले. उर्वरित पैसे दिलेच नाहीत. ठरल्याप्रमाणे पैसे देत नसल्याने १५ दिवसांनी काम बंद केले. त्या १५ दिवसांसाठी मिळालेल्या १ लाख ७५ हजार रुपयांपैकी १ लाख १० हजार रुपयेच कांबळेंना दिले. या दाम्पत्याने केलेल्या फसवणुकीमुळे आम्ही कर्जबाजारी झालो. त्यामुळे दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

BAMU
मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप; आजी-माजी आमदार हॉटेलवरच भिडले | Jalna Crime

अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू

छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी तरुणीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रा. अशोक बंडगर व त्याला मदत करणाऱ्या त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही त्याचा पत्ता लागला नाही. दरम्यान आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिस सांगत आहेत. दुसरीकडे संशयित आरोपीने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या ३० वर्षीय पीडित विद्यार्थी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन प्रा. अशोक बंडगर व त्याच्या पत्नीच्या विरोधात मंगळवारी (ता.२५) गुन्हा दाखल झालेला आहे. बंडगर याने तरुणीवर आपल्या घरातच वारंवार अत्याचार केले असून, त्याला त्याच्या पत्नीने या कृत्यात मदत केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने तक्रारीत केलेला आहे. दरम्यान, संशयित आरोपी हा गुन्हा दाखल होताच कुटुंबासह पसार झाला. पथकामार्फत संशयिताचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी विशाल बोडखे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com