एका बाकावर तीन विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा; विद्यापीठाचा सावळा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

one bench three student

एका बाकावर तीन विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा; विद्यापीठाचा सावळा गोंधळ

औरंगाबाद : औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला आहे. एका बाकावर तीन विद्यार्थ्यांना बसवून परिक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे उच्चशिक्षण मंत्र्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

(One Bench Three Student Exam)

दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने एका बाकावर तीन तीन विद्यार्थी बसवण्याची वेळ आल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे. या सावळ्या गोंधळावर उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: भोसलेंना व्हाईट हाऊस सोडावा लागणार? अँजेलिना जोलीने देखील केलं होतं शूटिंग

दरम्यान मागच्या दोन सव्वादोन वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या परिक्षा आता ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येचा अंदाज न आल्याने हा गोंधळ झाला आहे. विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात हा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. ऐनवेळी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने एका बाकावर तीन तीन विद्यार्थी बसवण्याची वेळ परिक्षा केंद्र संचालकावर आली आहे.

परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढल्याने सकाळी नऊ वाजता होणारा पेपर उशीरा घेण्यात आला होता. त्यामुळे दुपारी बारा वाजता या पेपरची सुरूवात झाली. ही माहिती कळताच विद्यापीठाच्या परिक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सदर परिक्षा केंद्रावर धाव घेतली आणि परिस्थिती हाताळण्यासाठी हातभार लावले. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याचं प्राचार्यांनी सांगितलं,

हेही वाचा: 'गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करेन'; शरीरसुखाची ऑफर देत युवकाला लुटलं

तीनही बाकावर बसवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे विषय वेगवेगळे होते त्यामुळे कोणताही सावळा गोंधळ झाला नाही असं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांनी सांगितलं.

Web Title: Bamu University One Bench Three Student Exam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top