'गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करेन'; शरीरसुखाची ऑफर देत युवकाला लुटलं

शरीर सुखाची ऑफर देत बोलावून घेतलं आणि त्याच्याकडून ५५ हजार रूपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
crime
crimeSakal
Updated on

पुणे : पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरूणाची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. शरीर सुखाची ऑफर देत बोलावून घेतलं आणि त्याच्याकडून ५५ हजार रूपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यासंदर्भात खडक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Pune Crime News)

यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, पुण्यात एमबीए करणाऱ्या एका विद्यार्थ्याला शरीरसुखासाठी बोलावले आणि एका खोलीत रात्रभर डांबून ठेवले होते. त्याला शरीरसुखाची ऑफर देत बोलावून घेतलं होतं. दरम्यान रात्री त्याचा व्हिडीओ काढला आणि गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

crime
बिहारमध्ये होणार जातीनिहाय जनगणना; राज्य सरकारला भाजपचा पाठिंबा

साहिल कुरेशी, अनिकेत जाधव, सुदामा चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून २३ वर्षीय तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. या २३ वर्षीय तरूणाला शरीरसुखाचे आमिष दाखवून या चौघांनी बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याला रात्रभर खोलीत डांबून ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढण्यात आला. त्यानंतर त्याला हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून ऑनलाईन ५५ हजार ६७९ रुपये ट्रान्सफर करून घेतले. त्याला गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याचा मोबाईलही काढून घेतला होता. त्यानंतर फिर्यादी तरूणाने दुसऱ्या दिवशी या पोलिसांकडे धाव घेतली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून चार तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या चार तरूणांवर समर्थ पोलीस स्टेशन मध्ये याअगोदरही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com