esakal | नेटवर्कचा परीक्षेत खोडा! विद्यार्थ्यांना मिळणार फेरपरीक्षेची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

बामू

कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे सर्वच विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे

नेटवर्कचा परीक्षेत खोडा! विद्यार्थ्यांना मिळणार फेरपरीक्षेची संधी

sakal_logo
By
अतुल पाटील : सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या पदवी-पदव्युत्तरच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना नेटवर्क, अतिवृष्टी, खंडीत वीजपुरवठा, लॉगईन न झाल्याने, अचानक साईट लॉगआउट झाल्याने परीक्षेला मूकावे लागले होते. त्यांना आता विद्यापीठाने फेरपरीक्षेची संधी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने मंगळवारी काढले असून २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान फेरपरीक्षा होणार आहेत.

कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे सर्वच विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. विद्यापीठ परिक्षेत्राबाहेरील राज्यभरातील हजारो विद्यार्थी आपल्या विद्यापीठातील विविध विद्या शाखेत शिकत आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत असल्याने अनेक विद्यार्थी आहे त्या ठिकाणावरून परीक्षा देत आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणे, घरात पाणी शिरणे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

हेही वाचा: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सासूबाईंचे निधन

त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेना व पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.योगेश पाटील यांची भेट घेऊन केली होती. चर्चेदरम्यान डॉ. पाटील ह्यांनी एकही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी देण्याबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले होते.

loading image
go to top