Hyderabad Gazette Banjara Issue
esakal
छत्रपती संभाजीनगर
Banjara Community Protest : आम्हालाही लागू करा हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाची ‘एसटी’ आरक्षणाची मागणी, बीडमध्ये १५ ला मोर्चा
Hyderabad Gazette Demand : हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण लागू करण्यासाठी बंजारा समाजबांधवांचा १५ सप्टेंबर रोजी बीडमध्ये भव्य मोर्चा होणार आहे.
बीड : हैदराबाद गॅझेट लागू करून राज्यातील बंजारा समाजबांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी येथे सोमवारी (ता. आठ) झालेल्या बैठकीत झाली. बैठकीला सुमारे वीस हजार समाजबांधव उपस्थित होते. या मागणीसाठी १५ सप्टेंबरला बीडमध्ये भव्य मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले.

