कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर

कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या बँक  कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर
Published on: 
LTR07HTP01.jpg लातूर ः कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप व पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे मागणी करताना बँक कर्मचारी. ---- कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर - लातूर, ता. ७ ः जिल्ह्यातील विविध बँका, आरबीआय नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्था तसेच मायक्रोफायनान्स संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, धमकावणे तसेच अडवणूक करण्यासारख्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मिळावे अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वतीने नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उमाप व पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कर्जवसुलीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे किंवा त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांविरोधात चिथावणीखोर संदेश प्रसारित करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बँका व वित्तीय संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी हे संस्थेच्या नियमावलीनुसार आणि वरिष्ठांच्या निर्देशानुसार आपले कर्तव्य पार पाडतात. कर्जाचे व्याजदर निश्चित करणे, कर्ज मंजूर करणे अथवा संस्थेची धोरणे ठरविणे हे त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे संस्थांच्या धोरणांबाबत असलेला रोष संबंधित कर्मचाऱ्यांवर काढणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध बँका, एनबीएफसी आणि मायक्रोफायनान्स संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.