
छत्रपती संभाजीनगर : शासनाने मद्यावरील विविध कर आणि परवाना शुल्कात पाच टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे बारमधील दारूच्या किमती पुन्हा वाढल्या. यामुळे हॉटेल आणि बारमध्ये बसून पिणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार असल्याचे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने सांगितले. एवढेच नाही तर यामुळे बारमध्ये जाण्याऐवजी पार्सल घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे हॉटेल आणि बारचालकांचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.