तब्बल ३० वर्षांची प्रतीक्षा संपली, बरड वस्तीला मिळाली वीज

कार्यक्रमाप्रसंगी महसुल तथा ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, अवघ्या आठ दिवसांत वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे
barad vasti
barad vastibarad vasti

अजिंठा (औरंगाबाद): तब्बल ३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील बरड वस्तीवर वीज मिळाली. येथील अंधार दूर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केली असून सोमवारी रात्री ८ वाजता राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते डीपीचा स्वीच सुरु होताच बरड वस्ती उजळून निघाली.

बरड वस्तीवर वीज सुरू करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मंत्री अब्दुल सत्तार
बरड वस्तीवर वीज सुरू करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मंत्री अब्दुल सत्तार

याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील बरड वस्तीवर जवळपास ३० वर्षांपासून नागरिकांनी विजेची प्रतिक्षा होती. येथे वीज नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. दरम्यान, याबाबत सकाळने वृत्त प्रकाशित करून नागरिकांच्या समस्येला वाचा फोडली होती. अखेर प्रशासनाने दखल घेऊन येथे वीज पोहोचवली.

barad vasti
खरिपाच्या पेरण्या २१ टक्क्यांवर, काही भागात पावसाची प्रतीक्षा

कार्यक्रमाप्रसंगी महसुल तथा ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, अवघ्या आठ दिवसांत वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता तत्काळ गावाला नवीन पाणी पुरवठा योजना देऊ तसेच वस्तीतील सर्व लोकांना रेशनकार्ड दिले जाईल. त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य दिले जाईल, वस्तीतील मुलांनी शिक्षण घ्यावे. खास बाब म्हणून या वस्तीला सर्व योजनेचा लाभ द्या, असे निर्देश राज्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महावितरण मुख्य अभियंता भुजंगराव खंदारे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय मराठे, तहसीलदार विक्रम राजपूत, तहसीलदार प्रवीण पांडे, अशोक सूर्यवंशी, दुर्गाबाई पवार, नजीर अहेमद, दीपक अस्तुरे, विजय पगारे, संजय आकोडे, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनिस, उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे, अनिल सैवर, सहायक अभियंता प्रदीप निकम, दीपक साखळे, सईद खान, केशव गोसावी, मनोज सोन्ने, अनाड गावच्या सरपंच रामकोरबाई बिरारे, उपसरपंच प्रवीण जाधव, तेजराव पवार, आत्माराम मुके, योगेश पवार यांची उपस्थिती होती.

barad vasti
पती कुटुंबियांपासून वेगळे राहत नसल्याने विवाहितेची आत्महत्या

बरड वस्तीला मॉडेल गाव करणार
-भविष्यात ज्या ज्या योजना लागतील त्या सर्व योजनेचा लाभ या वस्तीला मिळवून दिले जाईल. चार महिन्याच्या आत ज्यांना घरे नसतील त्यांना घरे मिळवून देऊ. तसेच बरड वस्तीला मॉडेल गाव करु असेही यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com