esakal | पती कुटुंबियांपासून वेगळे राहत नसल्याने विवाहितेची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

पती कुटुंबियांपासून वेगळे राहत नसल्याने विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: एकत्रित कुटुंबात मी काम करत नाही. पती कुटुंबियांपासून वेगळे राहत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. पतीचा काहीही संबंध नाही, अशी सुसाईड नोट लिहून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास वाळूज भागात घडली. पपिता राहुल वानखेडे (२४, रा.साई कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पपिताने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सासरा, दिर व पतीला जेवणाचा डब्बा करून दिला. सासू आणि नणंद या दोघीजणी दहा महिन्यांच्या मुलीला झोपी घालत होत्या. तर पपिता ही बेडरूममध्ये होती. बराच वेळ झाला तरी पपिता बाहेर आली नाही. आवाजाला देखील प्रतिसाद देत नसल्याने शेवटी दोघींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी पपिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला बेशुद्धवस्थेत तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

हेही वाचा: औरंगाबादेत १८ वर्षांवरील नागरिकांचे ७० केंद्रांवर लसीकरण

याप्रकरणी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गोरख चव्हाण व मनिषा केदार करत आहेत. या प्रकाराबद्दल मात्र पपिता हिच्या माहेरच्या मंडळींनी लग्न झाल्यापासून आमच्या मुलीला त्रास होता. तसेच तिचा पती तिच्यावर कायम संशय घेत होता. आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तसे तिच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर आणि तिचे हस्ताक्षर यात फरक असल्याचे पपिताचे नातेवाईक प्रवीण इंगळे यांनी सांगितले.

loading image