Chh. Sambhajinagar Crime : बीसीएच्या विद्यार्थ्याचा १८ वार करून हत्या; अंथरुणावर असतानाच हत्या
Crime News : उस्मानपुरा परिसरात १४ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजता बीसीए विद्यार्थी प्रदीप निपटे याची निर्घृण हत्या झाली. त्याला अंथरुणावर असतानाच १८ ते २० वार करून ठार करण्यात आले असून, तपासासाठी चार पथके दाखल झाली आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शरीरावर १८ ते २० वार करून विद्यार्थ्याचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास उस्मानपुरा परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली. प्रदीप विश्वनाथ निपटे (१९, रा. पिंपरखेड, जि. बीड, ह.मु. म्हाडा कॉलनी) असे मृताचे नाव आहे.