esakal | अंबाजोगाईत दोन दिवसांत तीस जणांवर अंत्यसंस्कार, पालिक कर्मचाऱ्यांनी दिला अग्नि

बोलून बातमी शोधा

baramati news
अंबाजोगाईत दोन दिवसांत तीस जणांवर अंत्यसंस्कार, पालिक कर्मचाऱ्यांनी दिला अग्नि
sakal_logo
By
शिवकुमार निर्मळे

अंबाजोगाई (बातमीदार) : परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ कोविड सेंटर आणि लोखंडी सावरगाव येथीत दोन कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत . शनिवार (ता. २४) आणि रविवार (ता. २५ ) या दोन दिवशी उपचार घेणाऱ्या तीस कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या वतीने त्यांच्यावर शनिवार व रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. दीड हजार रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अनेक जण गृहविलगीकरणात आहेत. संसर्ग झालेले अनेक गंभीर रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

हेही वाचा: एकुलत्या एक भावाला वाचविण्याऱ्या बहिणींनीचा लढा अपयशी, शुभेच्छाही ठरल्या तोकड्या

काही जणांना रक्तदाब, दमा, अस्थमा, मधुमेह यासह इतर आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. वयस्कर मंडळींची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे ते गंभीर होत आहेत. शनिवार व रविवार रोजी दोन्ही कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या तीस गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अठ्ठावीस जणांना अग्नि दिला आणि दोघांच्या दफनविधी करण्यात आला. कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत होणाऱ्या वाढीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान उपचारादरम्यान अनेक जण बरे होऊन घरी परतत आहेत.