
गेवराई : बीडमधील गेवराईच्या चकलांबा पोलिसांनी मंगळवारी गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करुन वहातूक करणा-या दोन ट्रॅक्टरवर कारवाई केल्यानंतर बुधवारी देखील वाळूची वाहतूक करणा-या हायवावर कारवाई करुन एकापाठोपाठ तस्करांना दणका देत दोन्ही कारवाईत एकूण ४१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.