esakal | सासऱ्याने गजाने मारुन जावयाचे नाकच केले फ्रॅक्चर

बोलून बातमी शोधा

सासऱ्याने गजाने मारुन जावयाचे नाकच केले फ्रॅक्चर
सासऱ्याने गजाने मारुन जावयाचे नाकच केले फ्रॅक्चर
sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जुन्या भांडणाच्या कारणाने सासऱ्याने जावयाला गजाने मारहाण केली. यात जावयाचे नाक फ्रॅक्चर झाले. तलवाडा (ता.गेवराई) येथे ही घटना घडली. गुरुवारी (ता. २९) सासऱ्यासह दोघांवर गुन्हा नोंद झाला. रामकिसन बबन सांगळे (३४, रा. तलवाडा) असे जखमीचे नाव आहे. ता. २६ एप्रिल रोजी रामकिसन सांगळे रामनगर येथील चारीच्या पुलाजवळ उभा होता.

यावेळी त्याचा सासरा हौसराव रामभाऊ सोनवणे व बापू विक्रम गर्जे (दोघेही रा. तलवाडा) हे तेथे आले. सासऱ्याने जुन्या भांडणातून शिवीगाळ केली. बापू गर्जेने त्याचे हात पकडले तर हौसरावने त्याच्या डोक्यात व तोंडावर गजाने मारहाण केली. यात जावयाचे नाकच फ्रॅक्चर झाले. तलवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.