esakal | प्रेमाला अडथळा निर्माण झाल्याने प्रेमीयुगलांनी गाठले पुणे

बोलून बातमी शोधा

null
प्रेमाला अडथळा निर्माण झाल्याने प्रेमीयुगलांनी गाठले पुणे
sakal_logo
By
टीम ई सकाळ

केज (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील एका गावातून पळून गेलेल्या प्रेमीयुगलांना पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेत पुणे येथून बुधवारी (ता.२१) ताब्यात घेऊन केज पोलिस ठाण्यात हजर केले. जमादार बाळकृष्ण मुंडे‌ यांनी ही कारवाई केली. तालुक्यातील एक‌ अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाइकांकडे राहत होती. तिची याच गावातील एका तरुणाशी ओळख झाली आणि या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. मात्र गावात त्यांच्या प्रेमाला अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पंधरा मार्च रोजी रात्री गावातून पलायन केले होते.

हेही वाचा: Video: खाण्या-पिण्याचे वांदे झाले, रिक्षावाल्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान हे जोडपे पुणे शहरात असल्याची माहिती मिळाली. तपास अधिकारी बाळकृष्ण मुंडे यांनी सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, धनपाल लोखंडे यांना सोबतीला घेऊन पुणे गाठले. तेथे एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास सोबत घेऊन प्रेमी जोडप्याला बुधवारी ताब्यात घेऊन केज पोलिस ठाण्यात हजर केले.