esakal | Video:खाण्या-पिण्याचे वांदे झाले, रिक्षाचालकांसमोर उपजीविकेचा प्रश्न

बोलून बातमी शोधा

Video: खाण्या-पिण्याचे वांदे झाले, रिक्षावाल्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न
Video: खाण्या-पिण्याचे वांदे झाले, रिक्षावाल्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न
sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : प्रत्येक रिक्षावाल्याच्या कुटुंबात पाच ते सात जण आहेत. त्यांना कसे जगवायचे?, असा प्रश्न रिक्षाचालक उपस्थित करित आहेत. अंशतः लाॅकडाऊन, नंतर संचारबंदी आणि आज गुरुवारी (ता.२२) रात्री आठपासून कडक लाॅकडाऊन लागणार आहे. याचा फटका रिक्षाचालकांना बसत आहे. शासनाने दोन प्रवासींपैकी अधिक बसण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना आर्थिक फटका बसत आहे. त्यात घरगुती, बँकेचे हप्ते आणि रिक्षाचा खर्च कसा करायचा हा प्रश्न रिक्षाचालकांना पडला आहे.

शासनाने देऊ केलेले पंधराशे रुपये त्यांना किती पुरणार? एक रिक्षाचालक म्हणाला, की पंधराशे रुपयांनी काय होणार आहे? सरकारने रिक्षाचालकांचे ऐकायला हवे. आमच्यावर उपाशमारीची वेळ आली आहे. या पुढे काय करावे. खाण्या-पिण्याचे वांदे झाले आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी आम्हाला केला. रिक्षाचालकांवर सर्व घर चालते. जर रिक्षाच बंद राहिली तर काय करायचा असा प्रश्न बहुतेकांना पडला आहे.