esakal | कोरोनाचे रुग्ण उकाड्याने त्रस्त, सतत वीजपुरवठा खंडीत

बोलून बातमी शोधा

 ऑनलाईन क्लास, परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा; महावितरणचे एमडी असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश

कोरोनाचे रुग्ण उकाड्याने त्रस्त, सतत वीजपुरवठा खंडीत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

घाटनांदूर (जि.बीड) : एप्रिल महिन्याचे रखरखते उन्ह त्यात कोरोना संसर्गाचा वाढता कहर. यात सतत खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे होम क्वारंटाईन असलेले कोरोना रुग्ण उकाड्याने हैराण झाले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या घाटनांदूर गाव असून लोकसंख्या वीस हजारापेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना हॉटस्पॉट म्हणून या गावाची ओळख बनलेली आहे. तालुक्यात दररोज एक हजारपेक्षा जास्त कोरोना संसर्गाचे बाधित रुग्ण निघत आहेत.

कोविड केंद्रात बेड शिल्लक नसल्याने सौम्य लक्ष असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. परंतु येथील महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने कोरोना संसर्गाने त्रस्त असलेल्या होम क्वारंटाईन रुग्णांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथे ३३ के.व्ही.चे सबस्टेशन आहे. गेल्या तीन वर्षांपासून या सबस्टेशनला पूर्ण वेळ कनिष्ठ अभियंता नाही. बर्दापुर तर कधी उजनीच्या कनिष्ठ अभियंत्याकडे अतिरिक्त पदभार दिलेला असतो. त्यामुळे कनिष्ठ अभियंता, लाइनमन, हेल्पर व इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. परिणामी बिघाड झाल्यास वेळेवर दुरुस्ती केली जात नाही.

कुटुंबातील काही सदस्य होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. उन्हाचा वाढता उकाडा व त्यात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने रुग्ण उकाड्याने त्रस्त झाले असून महावितरणने विद्युत पुरवठा अखंडित द्यावा.

-प्रवीण कुरकूट, घाटनांदूर