esakal | अंड्यांच्या मागणीसह दरातही वाढ; चिकन, मटणालाही पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

अंड्यांच्या मागणीसह दरातही वाढ; चिकन, मटणालाही पसंती

अंड्यांच्या मागणीसह दरातही वाढ; चिकन, मटणालाही पसंती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नेकनूर (जि.बीड) : कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी उपयुक्त ठरत असल्याने मागणी आणि दरही दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात शक्यतो अंड्यांची मागणी घसरते. कोरोनामुळे गतवर्षी याच वेळी अंडी व बॉयलर चिकनचे भाव कमालीचे घसरले होते. येथे केवळ तीस रुपयांना अंड्यांचे कॅरेट विकले जात होते. यंदा मात्र स्थिती उलटी असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत आहे. अंडी, चिकन, मटण खाल्ल्याने प्रोटीन मिळते, रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

त्यामुळेच अनेक जण अंडी, चिकन, मटणाचा आहारात समावेश करताना दिसून येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तीन रुपये प्रतिनग विकले जाणारे अंडे सध्या सहा रुपयांवर गेले आहे. गावरान अंडे १० ते १२ रुपये प्रतिनग या दराने विकले जात आहे. दीड महिन्यापूर्वी बर्ड फ्लूची चर्चा होती. त्यावेळी अंडी चिकन मटणचे भाव कमी झाले; पण कोरोनाच्या संसर्गात बर्ड फ्लू कुठे हरवला हे कळलेही नाही.

अंड्यांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असल्याने मर्यादित स्वरूपात त्याचे सेवन केल्यास शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो.

- डॉ. आशिलेष शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री व कुटीर रुग्णालय