
हलगर्जीपणा केला तर थेट निलंबन, सुनील केंद्रेकरांचा अधिकाऱ्यांना इशारा
गेवराई (जि.बीड) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी (IAS Sunil Kendrekar) गेवराई उपजिल्हा रुग्णालयाला (Gevrai Sub-District Hospital) बुधवारी (ता.१२) भेट दिली. यावेळी तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. स्थानिक अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आरोग्य विषयक समस्यांचा आढावा घेत उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रत्येक रुग्णाचा जीव कसा वाचवेल?यासाठी प्रयत्न करावेत. यामध्ये (Beed) जर कोणी हलगर्जीपणा केला तर त्यांना थेट निलंबित करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिल. प्रत्येक रुग्णाचा (Corona) जीव कसा वाचवेल यासाठी प्रयत्न करावेत. यामध्ये जर कोणी हलगर्जीपणा केला तर त्यांना थेट निलंबित करण्यात येईल असा इशारा श्री. केंद्रेकरांनी यावेळी दिला.(Beed Latest News I Don't Bear Irresponsibility Of Officers, Said Sunil Kendrekar)
हेही वाचा: औरंगाबादकरांनो मुलांची काळजी घ्या! २६ बालके कोरोनाबाधित
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची व्यवस्थित तपासणी करा. त्याच्या परिस्थितीनुसार रुग्णालयात दाखल करून घ्या. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, गरजेनुसार ऑक्सिजन द्या. योग्य तेच उपचार द्या. ऑक्सिजन वाया घालू नका. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याच्या आधीच वरिष्ठांना कळवा. वरिष्ठांशी समन्वय ठेवा आणि उपाययोजना करा. हे करत असताना वरिष्ठ दाद देत नसतील तर मला कळवा अशा सूचनाही श्री.केंद्रेकर यांनी आढावा बैठकी दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.चिंचोळे, गटविकास अधिकारी सानप, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ.राजेश शिंदे आदी उपस्थित होते.
Web Title: Beed Latest News I Dont Bear Irresponsibility Of Officers Said Sunil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..