
औरंगाबादकरांनो मुलांची काळजी घ्या! २६ बालके कोरोनाबाधित
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित बालकांना (Corona Positive Children In Aurangabad) विशेष लक्ष दिले जात आहे. सोमवारी (ता.११) एकाच दिवसात शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ३१ जण कोरोनाबाधित झाल्याचे महापालिकेच्या (Aurangabad) अहवालातून समोर आले होते. दरम्यान, मंगळवारी (ता.१२) शहराच्या विविध भागातून २६ बालकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बालकांसाठी २०० खाटांचे विशेष रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Aurangabad Breaking News 26 Children Tests Covid Positive)
हेही वाचा: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे आंदोलन; काळे झेंडे लावून 'महाविकास',भाजपचा निषेध
त्यात एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे १००, तर गरवारे कंपनीच्या परिसरात सुरू होणारे ऑक्सिजन बेडचे १०० खाटांचे रुग्णालय बालकांसाठीच राहणार आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यातील आकडेवारी पाहता कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतही कोरोनाबाधित बालकांची संख्या अधिक दिसून येत आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार शून्य ते १८ वर्षे वयोगटातील सर्वजण बालक संवर्गात आहेत. त्यानुसार, गेल्या दीड महिन्यात शून्य ते पाच वयोगटातील ४६५ बालके बाधित निघाली तर पाच ते अठरा वयोगटातील २,४१५ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहेत, असे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Web Title: Aurangabad Breaking News 26 Children Tests Covid
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..