लॉकडाउन संपल्यानंतर बीडला पहिला मोर्चा, आरक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलन

आरक्षण रद्द झाल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे यापुढे निघणारे मोर्चेही आक्रमक असतील.
लॉकडाउन संपल्यानंतर बीडला पहिला मोर्चा, आरक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलन

बीड : मराठा समाज (Maratha Community) आता मूक नाही तर ठोक मोर्चा, आक्रोश मोर्चा काढणार असून लॉकडाउन संपल्यानंतर बीडमध्ये पहिला मोर्चा निघेल, अशी माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court Says, Maratha Quota Unconstitutional) मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर गुरुवारी (ता. सहा) येथे मेटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ते म्हणाले, आरक्षण रद्द झाल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे यापुढे निघणारे मोर्चेही आक्रमक असतील. शुक्रवारी (ता. सात) पाच व्यक्ती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देतील. मुख्यमंत्र्यांनी आता शक्य असलेल्या पद्धतीने तत्काळ आरक्षण (Maratha Reservation) द्यावे, अन्यथा राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला जाईल. (Beed Live Updates After Lock Down First Rally For Maratha Reservation In Beed)

लॉकडाउन संपल्यानंतर बीडला पहिला मोर्चा, आरक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलन
औरंगाबादेत आज फक्त १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण

आरक्षणाची लढाई तीन दशकांहून मोठी आहे. जगाचे लक्ष वेधणारे ५८ मूकमोर्चे निघाले होते. काही तरुणांनी बलिदान दिले. आरक्षण रद्द झाल्याने समाजासमोर अंधार निर्माण झाला आहे. न्याय मिळेपर्यंत आरक्षणासाठीचा संघर्ष सुरूच ठेवणार असून राज्यभर आंदोलन उभे करणार असल्याचे मेटे म्हणाले. छावाचे गंगाधर काळकुटे, सनदी लेखापाल बी. बी. जाधव, सुधीर काकडे, सचिन कोटुळे, मनोज जाधव, गणेश मोरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com