esakal | निष्काळजीपणाचा कळस! कोरोनाबाधित रुग्ण मास्क काढून चक्क तोंडावर थुंकला
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

आम्ही बेजबाबदार! कोरोनाबाधित रुग्ण मास्क काढून चक्क तोंडावर थुंकला

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि.बीड) : सध्या सर्वत्र कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांकडून काळजी घेतली जात आहे. अशा भयानक परिस्थितीत शेत नांगरण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात कोरोनाबाधिताने तोंडावर थुंकून मारहाण केल्याची घटना  शुक्रवारी (ता.३०) रोजी सारूकवाडी येथे घडली. या प्रकरणी रविवारी (ता.दोन) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सारुकवाडी येथे सुभाष बळीराम फुंदे व त्याची आई कुसुम बळीराम फुंदे हे दोघे कोरोना संसर्गबाधित रूग्ण असून ते सध्या गृहविलगीकरणात आहेत. याच दरम्यान शुक्रवारी श्रीराम पांडुरंग फुंदे  व मुलगा दीपक श्रीराम फुंदे हे दोघे बाप-लेक आपल्या मालकीच्या शेतात कापसाच्या पऱ्हाट्या काढत असताना त्यांच्या शेता शेजारील भावकीत किरकोळ कारणावरून वाद झाला.

हेही वाचा: घरी जाताना गरोदर महिलेचा वेदनादायी मृत्यू, वीज अंगावर कोसळून शेवट

या भांडणात  तू आमच्या मालकीच्या शेतात नांगर घालू नकोस, तू तुझेच शेत नांगर, असे म्हणताच भावकीतील सुभाष फुंदे याने दीपकला शिवीगाळ करत स्वतः कोरोनाबाधित असल्याचे माहित असतानाही अंगावर धावून जात तोंडावरचे मास्क काढून तोंडावर व अंगावर थुंकला.  तसेच सुभाषची आई कुसुम फुंदे, पत्नी उषा फुंदे व वडील बळीराम फुंदे यांनी तक्रारदार श्रीराम फुंदे व दीपक फुंदे या बाप-लेकांना काठीने मारहाण करून मुक्का मार दिला. या प्रकरणी श्रीराम फुंदे यांनी रविवारी दिलेल्या तक्रारीवरून बळीराम पांडुरंग फुंदे, सुभाष बळीराम फुंदे, कुसुम बळीराम फुंदे  व उषा सुभाष फुंदे यांच्या विरोधात जीवघेणा साथ रोग परसविणे निष्काळजीपणा व साथ रोग कायद्याचे उल्लंघन करणे, मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अमोल गायकवाड हे करीत आहेत.

loading image
go to top