esakal | घरी जाताना गरोदर महिलेचा वेदनादायी मृत्यू, वीज अंगावर कोसळून शेवट
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

घरी जाताना गरोदर महिलेचा वेदनादायी मृत्यू, वीज अंगावर कोसळून शेवट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड/नेकनूर : जिल्ह्यात शनिवार (ता.एक) व रविवार (दोन) असे दोन दिवस विजांचा कहर, अवकाळी पाऊस, गारपीट सुरूच आहे. दोन दिवसांत वीज पडल्याच्या चार घटना घडल्या. रविवारी नेकनूरला एका गर्भवतीचा मृत्यू झाला. शनिवारीही केज व धारूर तालुक्यातील बहुतांशी भागात वादळासह पावसाने हजेरी लावली. रविवारी सानपवाडी येथे वीज पडून दोन बैल ठार झाले. तर, बेंगळवाडी (ता. केज) येथे हनुमान मंदिराच्या शिखरावर वीज कोसळली. वीज पडून नेकनूरमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार (ता.दोन) रोजी दुपारी तीनच्या सुमारास नेकनूरमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा हा पाऊस जवळपास अर्धातास सुरू होता.

हेही वाचा: निसर्गाचा निर्दयीपणा! वीज पडून दोघांचा औरंगाबाद तालुक्यात दुर्दैवी मृत्यू

या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, तर या पावसामुळे नेकनूरमध्ये लोखंडे वस्ती येथील राधाबाई दीपक लोखंडे (वय २०) या महिलेचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. राधाबाई आपल्याला नातेवाइकांसह वादळवारे सुटल्यामुळे घराकडे परतत होती, तेव्हा अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाल्या. राधाबाई या आठ महिन्याची गर्भवती होती. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

loading image