

Beed on Edge After Street Shooting Murder; Special Police Teams Launched
Sakal
बीड : बीड शहरातील अंकुशनगर परिसरात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हर्षद तुळशीदास शिंदे (वय ३८, रा. धानोरा रोड, हाउसिंग कॉलनी) असे मृताचे नाव असून, तो बीड नगर परिषदेत कंत्राटी प्लंबर म्हणून कार्यरत होता. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.