crime
Sakal
छत्रपती संभाजीनगर - मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर सांत्वनपर भेटण्यास आलेल्या मैत्रिणीने घरातील ४९ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना तीन डिसेंबरला दुपारी साडेतीन ते साडेनऊच्या दरम्यान जाधववाडी, गल्ली क्रमांक सातमध्ये घडली. याप्रकरणी पैसे चोरून नेणाऱ्या मैत्रिणीविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ज्योती बनकर असे संशयिताचे नाव आहे.