अवैध खरेदी-विक्रीबाबत दक्ष राहा; अब्दुल सत्तार

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आढावा बैठकीत सूचना
Beware of illegal buying and selling Abdul Sattar aurangabad
Beware of illegal buying and selling Abdul Sattar aurangabadsakal

औरंगाबाद : मुद्रांक नोंदणी सुविधा व्यापक करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने तालुकास्तरावर अद्ययावत इमारतीकरिता जागा निश्चिती करून संबंधितांनी जलदगतीने प्रस्ताव पाठवा. भूमाफियांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी नियमबाह्य खरेदी-विक्रीबाबत दक्ष राहण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्या.विभागीय आयुक्तालयात गुरुवारी (ता.सात) राज्यमंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणी व मुद्रांक विभागीय आढावा बैठक झाली, बैठकीत त्यांनी यासूचना केल्या. बैठकीला नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हार्डिकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नोंदणी व मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक गोविंद कराड तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दस्तनोंदणी संदर्भात तुकडा बंदी नियमानुसार कार्यवाही अचूकपणे पार पाडावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीत नियमबाह्य खरेदी-विक्रीबाबत दक्ष राहावे. जेणेकरून भूमाफियांच्या मुळापर्यंत पोचून अवैध व्यवहारांना पायबंद घालणे सोपे होईल. त्याचबरोबर अवैध दस्त नोंदणीला आळा घालण्याकरिता केंद्रस्तरावर तसेच राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असून याकरिता तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करून येत्या अधिवेशनापर्यंत नियम तयार करण्याच्या दृष्टीने माहिती पाठविण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. मुद्रांक नोंदणीद्वारा मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल प्राप्त होतो. त्या माध्यमातून सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा देणे शक्य होते, असे सांगून यावर्षीचे महसूल उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल श्री.सत्तार यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

सुनील केंद्रेकर यांनी जमीन खरेदी करताना नागरिकांनीदेखील सातबारा, लेआऊटची सत्यप्रत, सर्च रिपोर्ट आदी बाबी काळजीपूर्वक तपासूनच व्यवहार करावा, त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक सर्व बाबी तपासाव्यात अशा सूचना दिल्या. बैठकीच्या प्रारंभी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध दस्त नोंदणी, महसूल उद्दिष्टे, तुकडा बंदी, दस्त व्यवहार आदीं संदर्भात सविस्तर माहिती दिली.

बेकायदेशीर दस्त व्यवहार झाल्यास ‘एफआयआर’

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हार्डिकर यांनी बेकायदेशीर दस्त व्यवहार होणार नाही याकरिता काटेकोरपणे संबंधित अधिकाऱ्यांनी पालन करावे आणि जर बेकायदेशीर दस्त व्यवहार झाल्यास तत्काळ संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करावा. जेणेकरून पहिल्या टप्प्यातच बेकायदेशीर व्यवहाराला पायबंद घातला जाऊन व्यवहारात पारदर्शकता येईल. मुद्रांक कार्यालयात सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही यावेळी श्री.हार्डिकर यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com