Sambhaji Nagar : एकरकमी परतफेड योजना राबवा ; डॉ. कराड, आदर्श पतसंस्था घोटाळाप्रकरणी निर्देश

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात १८५ कर्जदारांकडे तब्बल २५३ कोटींचे कर्ज थकले आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. कराड, आदर्श पतसंस्था घोटाळाप्रकरणी निर्देश
डॉ. कराड, आदर्श पतसंस्था घोटाळाप्रकरणी निर्देशsakal

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात १८५ कर्जदारांकडे तब्बल २५३ कोटींचे कर्ज थकले आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात ज्या कर्जदारांनी तारण न ठेवता कर्जे उचलली, त्यांच्यावर गुन्हे नोंद करा आणि एकरकमी परतफेड योजना राबवा, असे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी (ता. तीन) अधिकाऱ्यांना दिले.

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी डॉ. कराड यांनी बैठक घेतली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, जिल्हा विशेष लेखा परीक्षक सु.प. काकडे, जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, सहायक आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर, प्रशासक समितीचे सदस्य विष्णू रोडगे आदी उपस्थित होते. ‘‘ज्या कर्जदारांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज उचलले त्यांची तपासणी करून नावे द्यावीत, त्यांच्याविरोधात तक्रार द्यावी, गुन्हे दाखल करण्यात येतील’’, असे लोहिया यांनी सांगितले. सहकार आयुक्त कवडे यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेबाबत माहिती दिली.

डॉ. कराड, आदर्श पतसंस्था घोटाळाप्रकरणी निर्देश
Sambhaji Nagar : सत्तार म्हणाले, ‘मी पक्का राजकारणी!’ ; हज हाउसच्या लोकार्पणात मिश्कीलपणे उलगडले स्व-व्यक्तिमत्त्व

खासदारांनी वसुलीतही मदत करावी

ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. त्यांनी केवळ आंदोलन न करता थकीत कर्जाच्या वसुलीसाठी प्रयत्न करावेत. या बैठकीला त्यांनाही बोलावण्याचा प्रयत्न झाला. परंतु, संपर्क न झाल्याने त्यांना बोलावण्यात आले नसल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

संस्थेत १ हजार ७०५ कर्जदार असून, ५ लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांची संख्या १ हजार ३८५ आहे. त्यांच्याकडून १८ कोटी ८५ लाख तर ५ लाखांवरील कर्जदारांची संख्या ३२० आहे. त्यांच्याकडून २६४ कोटी ५३ लाख रुपये कर्ज वसूल करणे बाकी आहे. १ कोटीपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांची संख्या ३१ आहे. त्यांच्याकडून २१६ कोटी ५१ लाख रुपये वसूल करणे बाकी आहे. ज्या कर्जदारांनी योग्य तारण न ठेवता कर्ज उचलले त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश डॉ. कराड यांनी बैठकीत दिले.

- अनिल कवडे, सहकार आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com