esakal | मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड?,खासदार मुंबईला रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwat-Karad

खासदार भागवत कराड यांची ही वर्णी लागणार असल्याचे बोलले जात असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ही भाजप प्रदेश कार्यकारिणीतर्फे वर्तवण्यात येत आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड?,खासदार मुंबईला रवाना

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारीकरणाच्या हालचाली गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू आहेत. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांचे नावासह औरंगाबादचे Aurangabad राज्यसभा खासदार भागवत कराड MP Bhagwat Karad यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुंबईला रवाना झालो असल्याची माहिती स्वतः खासदार कराड यांनी मंगळवारी (ता.सहा) 'सकाळ'ला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात Union Council Of Ministers नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे. त्यासाठी अनेकांच्या नावांची चाचपणी करण्यात आली आहे. यात खासदार भागवत कराड यांची ही वर्णी लागणार असल्याचे बोलले जात असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ही भाजप प्रदेश कार्यकारिणीतर्फे वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात Maharashtra ओबीसींचे राजकीय आरक्षण Obc Political Reservation रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजात केंद्र व राज्य सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.bhagwat karad may induct narendra modi government as minister, he leave for mumbai

हेही वाचा: पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

त्याच पार्श्वभूमीवर समाजाचा रोष आपल्यावर व्यक्त होऊ नये. या दृष्टीने ओबीसी समाजातून Obc Community मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी देण्याचा विचार केंद्रीय कार्यकारिणीतर्फे करण्यात येत आहे. खासदार भागवत कराड हे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करत ओबीसी समाजाला शांत करण्याचा प्रयत्नही भाजपतर्फे BJP केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भागवत कराड यांच्या नावाची चर्चा होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी चेहरा मिळाल्यास राज्यात आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी फायद्याचे ठरेल याच दृष्टीने खासदार भागवत कराड यांच्या नाव चर्चेत आहे. याच अनुषंगाने खासदार भागवत कराड हे मुंबईला रवाना झाले आहेत. केव्हाही त्यांना मंत्रिमंडळ विस्तारीकरणासाठी फोन येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

loading image