
Diwali Eve Tragedy: Drunken Fight Ends in Kin's Murder
Sakal
भोकरदन : दिवाळीच्या अवघ्या दोन दिवस आधी भोकरदन शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मामा आणि एका भाच्याने मिळून दुसऱ्या भाच्याचा खून केल्याची ही घटना शनिवारी ता.१८ रोजी रात्री उशिरा घडली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला होता. मात्र, भोकरदन पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांच्या आत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.