Imtiaz Jaleel : भुमरेंचा जमीन घोटाळा साडेआठ एकरांचा; इम्तियाज जलील यांचा आरोप, सीबीआय, ‘ईडी’मार्फत चौकशी करा
8.5 Acre Land Scam Maharashtra : छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे तब्बल ८.५ एकर जमीन हिबानामा करून घेतल्याचा आरोप झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर अडीच नव्हे, तर तब्बल साडेआठ एकर जागा हिबानामा करून घेण्यात आली आहे. ४ लाख ३३ हजार ३२५ चौरस फुटांचा हा भूखंड असून ३६ हजार १९० रुपये रेडीरेकनरचा दर आहे.