esakal | बिडकीन पोलिस उतरले रस्त्यावर, ग्रामसुरक्षा दलांची होणार स्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

लोहगाव (जि.औरंगाबाद) : ग्रामभेट बैठकीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने.

बिडकीन पोलिस उतरले रस्त्यावर, ग्रामसुरक्षा दलांची होणार स्थापना

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : कोरोना महामारी दुसऱ्या टप्प्याच्या अंतिम चरणात वाढलेल्या चोरी, दरोडा प्रकरणाला अटकाव करण्यासाठी बिडकीन पोलिस Bidkin Police ग्रामभेटीच्या माध्यमातून गावागावात रात्रगस्तीसाठी ग्रामसुरक्षा दल निर्माण करण्यासाठी जनतेच्या दरबारात उतरले आहे. त्या माध्यमातून मालमत्ता सुरक्षा चोरीसारख्या घटनेला आळा बसणार आहे. गेल्या काही महिन्यांत लोहगावसह (ता.पैठण) Paithan परिसरात शेतवस्ती व गावात मध्यरात्री अज्ञात चोरांनी घरे फोडून लाखो रूपये नगदी, दागिने ऐवजाची चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्याची दखल बिडकीन पोलिसांनी घेत श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथकाच्या मदतीने तपास सुरू असताना पुन्हा अनेक ठिकाणी लहानमोठ्या चोरीचे प्रकार वाढत आहेत.bidkin police being form gram surksha dals in paithan tahsil

हेही वाचा: Hingoli : हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, पहाटेपासून सुरूवात

त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा Aurangabad पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील Superitendent Of Police Mokshada Patil , प्रभारी पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या संकल्पनेतून बिडकीन पोलिस ठाणे हद्दीतील लोहगाव, मुलानीवाडगाव आदी गावांत सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, गोपनीय शाखेचे भगवान जाधव, बीट हवालदार गोविंद राऊत आदींनी मंगळवारी (ता.सहा) ग्रामभेटीच्या माध्यमातून पदाधिकारी, नागरिक, युवकांशी संवाद साधून रात्र गस्तीसाठी ग्रामसुरक्षा दलात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी मालमत्ताची काळजी घेण्यासाठी सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक सायरन, घरांना लोखंडी जाळी, ग्रील, शेतवस्ती व्हाँट्सअॅप ग्रुप तयार करणे या सारखे उपाययोजना कराव्यात असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

loading image