

most popular wedding lighting trends 2025
Sakal
तुळशी विवाहाच्या मंगल सोहळ्याने शुभमुहूर्तांची सुवर्णदारे उघडली असून, शहरभर विवाह सोहळ्यांची लगबग दिसू लागली आहे. सजावटीच्या रंगांनी रंगलेले बाजार, लखलखणाऱ्या लायटिंगचे झगमगते तंबू, तर विविध थीम्सच्या सौंदर्याने खुलणारी मंडपस्थळे असा सगळीकडे उत्सवाचा, उमेदीचा आणि उन्मेषाचा जल्लोष पसरत आहे. परंपरेच्या पाऊलखुणांना आधुनिकतेची किनार लाभताच, लग्नसराईत ‘थीमबेस मंडप’ हा नवा ट्रेंड लग्न सोहळ्यांना खुणावू लागला आहे. लग्नाळू लोक आता साधेपणापेक्षा सौंदर्य आणि सौंदर्यापेक्षा सृजनशीलतेला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत.