छत्रपती संभाजीनगर - राज्याच्या शिक्षण विभागात वर्ग एक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सध्या जोरदार घोडेबाजार सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदांवरील बदल्यांसाठी थेट लाखो रुपयांचा ‘व्यवहार’ सुरू असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एका बदलीसाठी ५० ते ७० लाख रुपये दिले जात असल्याच्या आरोपांमुळे शिक्षण विभागाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा धुळीला मिळाल्याचे चित्र आहे.