TET Scam : याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा; औरंगाबाद खंडपीठानं दिले 'हे' निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET Scam : याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा; औरंगाबाद खंडपीठानं दिले 'हे' निर्देश

TET Scam : याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा; औरंगाबाद खंडपीठानं दिले 'हे' निर्देश

औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरणी राज्य शासनानं एक महत्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतन थांबवण्याचं सरकारनं ठरवलं होतं, तसेच याची यादी देखील प्रसिद्ध केली होती. पण याविरोधात काही शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. (Big relief to petitioners in TET scam Aurangabad bench gave IMP direction)

हेही वाचा: Patra Chawl : पत्राचाळ घोटाळ्यात माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग? EDच्या आरोपपत्रामुळं खळबळ!

या अनेक याचिकांवर आज खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी खंडपीठानं म्हटलं की, शिक्षकांचं वेतनं थांबवणं हा त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करणं आहे. त्याचबरोबर येत्या काळात दिवाळीचा सणवार असणार आहे. तसेच या घोटाळ्याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्टता दिसत नाही, असं सांगत "या शिक्षकांची वेतनवाढ रोखू शकता पण वेतन थांबवू नका" असं कोर्टानं म्हटलं आहे. यानंतर आता शासकीय वकिलांनी युक्तीवादासाठी पुढची वेळ मागितली आहे. त्यामुळं शिक्षकांना हा अंतरिम दिलासा आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : ''दिल्ली जेवढं फडणवीसांचं ऐकते तेवढं शिंदेंचं ऐकणार का?''

हा दिलासा औरंगाबाद खंडपीठात ज्या दोनशे याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकाकर्त्या शिक्षकांनाच हा दिलासा देण्यात आला आहे. पण त्यांना यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Web Title: Big Relief To Petitioners In Tet Scam Aurangabad Bench Gave Imp Direction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..