

उस्मानपुरा : चौकात बांधण्यात येत असलेल्या वाहतूक बेटामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याची ओरड होत असतानाच शुक्रवारी (ता. २१) सकाळी भीषण अपघात झाला. दुचाकीवरील तरुण ट्रकखाली येऊन १५ फूट फरफटत गेला. यात तो गंभीर जखमी झाला. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.