Biomedical Waste : वैद्यकीय कचऱ्याची वाढणार डोकेदुखी! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हेकेखोरपणा; नव्या एजन्सीला मिळेना सहकार्य
Chh. Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी नव्या एजन्सीला परवानगी न मिळाल्याने समस्या वाढत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हेकेखोरपणा अडथळा ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीचा प्रकल्प महापालिकेने ताब्यात घेतला. हा प्रकल्प आता नव्या बायोटेक कंपनीमार्फत चालविला जात आहे.