
छत्रपती संभाजीनगर : उदगीर येथे अचानक बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रादेशिक पशुसंवर्धन विभागामार्फत तातडीने जायकवाडी १०, दानापूर धरण १२, बिंदुसरा प्रकल्प १० आणि येलदरी धरण १४ अशा एकूण ४६ पक्ष्यांचा सर्व अहवाल शनिवारी (ता. २५) तपासणीअंती निगेटिव्ह आला.