औरंगाबादच्या क्रीडा विद्यापीठासाठी भाजपचे आंदोलन

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याविरोधात भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.
औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याविरोधात भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.

औरंगाबाद : औरंगाबादला (Aurangabad) मंजूर झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (International Sports University) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) पुण्याला (Pune)पळवले आहे. या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) बुधवारी (ता.चार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी आमच्या हक्काचे क्रीडा विद्यापीठ आम्हाला परत करा, अशा घोषणा करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार अतुल सावे (MLA Atul Save), शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. क्रीडा विद्यापीठ मराठवाड्याला (Marathwada) मिळालेच पाहिजे. आघाडी सरकार हाय हाय! अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याविरोधात भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.
बाळासाठी स्तनपान नैसर्गिक अन् कधीही उपलब्ध असणारे पूर्ण अन्न

यावेळी आमदार सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रवक्ते शिरीष बोराळकर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर, मनीषा भन्साळी, प्रतिभा जराड, मनिषा मुंडे, सविता घोडतुरे, जालिंदर शेंडगे, बबन नरवडे, संजय जोशी, पंकज भारसाखळे, राजेश मेहता, अशोक दामले, दौलतखान पठाण, लक्ष्मीकांत थेटे, अरुण पालवे, ताराचंद गायकवाड, प्रशांत भदाणे पाटील, हुशारसिंग चौहान, सुदाम साळुंखे, अर्जुन गवारे, गीताताई कापुरे, गीताताई आचार्य, सुनीता गावंडे, बंटी हेकाडे, प्रतिभाताई जऱ्हाड, सुप्रियाताई चव्हाण, दिव्याताई पाटील, संजय फत्तेलष्कर, संजय जाईबहार, रवि एडके, ओम अग्रवाल, शाकीर राजा, धनंजय पालोदकर, अशोक गोरे, मिलिंद काकडे, निरज जैन, प्रतिक शिरसे, राजेंद्र वाहुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com