औरंगाबाद : भाजपतर्फे गजानन महाराज मंदिरात आरती करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
औरंगाबाद : भाजपतर्फे गजानन महाराज मंदिरात आरती करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. BJP Celebration In Aurangabad After Opening Temples

मंदिरे खुली केल्याबद्दल भाजपने औरंगाबादेत साजरा केला आनंदोत्सव

औरंगाबाद : राज्य सरकारने राज्यातील धार्मिकस्थळे गुरुवारपासून (ता.सात) खुली केली. ही मंदिरे उघडण्यात यावेत यासाठी भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडीतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनास यश मिळाल्याचे सांगत भाजपतर्फे गजानन महाराज मंदिरात आरती करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad), आमदार अतुल सावे (Atul Save), शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरती करण्यात आली. सरकारला पहिल्या माळेच्या (Aurangabad) दिवशी सद्बुद्धी मिळाली म्हणून मंदिरे सुरु झाल्याची प्रतिक्रिया सावे यांनी दिली. तर ही मंदिरे आता पुन्हा बंद होऊ नयेत, अशी अपेक्षा डॉ. कराड यांनी व्यक्त केली. लोक आपल्याला घरी पाठवतील या भितीपोटी या तिघाडी सरकारने मंदिरे खुली केले आहे.

औरंगाबाद : भाजपतर्फे गजानन महाराज मंदिरात आरती करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात उत्साहात घटस्थापना

भाजपतर्फे सातत्याने मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने केल्याची प्रतिक्रिया केणेकर दिली. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे, भगवान घडामोडे, आध्यत्मिक आघाडीचे संजय जोशी, राजू शिंदे, जालिंदर शेंडगे, माधुरी अदवंत, शालिनी बुंधे, दयाराम बसये, महेश माळवतकर, रवी एडके, मनीषा भन्साळी, लक्ष्मीकांत थेटे, मंगलमूर्ती शास्त्री, संजय जोरले, प्रशांत भदाणे पाटील, गोविंद केंद्रे, रामचंद्र नरोटे, मनीषा मुंडे, ताराचंद गायकवाड, मनोज भारस्कर, पंकज साखला, बबन नरवडे, बालाजी मुंडे, संजय खनाळे, लता सरदार, संध्या कापसे, गीता कापुरे,राधा इंगळे, साहेबराव निकम, शिवाजी साळुंके पाटील, कुणाल मराठे, राजू खाजेकर,संजय बोराडे, घेवारे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com