Chhatrapati Sambhajinagar News : विषय समित्यांवर भाजपच! पवार, मोठे, सोनटक्के, गरड यांची बिनविरोध निवड

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीत मीनाक्षी पवार, अनिता मोठे, बालाजी सोनटक्के आणि सचिन गरड यांची बिनविरोध निवड झाली.
minakshi Pawar anita Mothe balaji Sontakke and sachin Garad

minakshi Pawar anita Mothe balaji Sontakke and sachin Garad

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीत मीनाक्षी पवार, अनिता मोठे, बालाजी सोनटक्के आणि सचिन गरड यांची बिनविरोध निवड झाली असून भाजपने आपले राजकीय वर्चस्व अधिक अधोरेखित केले. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर ही महत्त्वाची राजकीय लढत मानली जात होती. सुरवातीपासून आखलेल्या रणनीतीमुळे विरोधकांना कोंडीत पकडण्यात भाजपला यश आले. परिणामी, विरोधकांकडून उमेदवारी अर्जच दाखल झाला नाही आणि भाजपने चारही विषय समित्यांवर नियंत्रण मिळवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com