

Parbhani ZP Elections: BJP’s Varpudkar Suffers Big Family Defeat
Sakal
परभणी: परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मतदारांनी अभूतपूर्व असा धक्का दिला आहे. या निवडणुकीत वरपुडकर यांचे पुत्र समशेर वरपुडकर, मुलगी सोनल देशमुख, सून प्रेरणा समशेर वरपुडकर आणि पुतणे उत्कर्ष विजयराव वरपुडकर या चौघांचा पराभव झाला, तर काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले दुसरे पुतणे अजित अनिलराव वरपुरडकर हे मात्र लोहगाव गटातून विजयी झाले.