

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी १८ जूनला मतदान होणार आहे. शिवसेनेच्या या जागेवर भाजप पहिल्यांदाच निवडणूक लढवित असल्याने पक्षाकडून ‘नो रिस्क’ धोरण अवलंबले जात आहे. याच अनुषंगाने रविवारी (ता. १४) एका पंचतारांकित हॉटेलात साडेचारशेवर नगरसेवकांच्या पंगती उठल्या. विशेष म्हणजे यावेळी महायुतीचे घटक नसलेल्या ३९ नगरसेवकांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.