
विठुराया तुझ्या पुजेसाठी देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद द्या, भाजपकडून साकडे
करमाड (जि.औरंगाबाद ) : महाविकास आघाडीतील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने संपूर्ण औरंगाबाद (Aurangabad) तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिकडे तिकडे याच राजकीय विषयावर तासन् तास गप्पा रंगत असल्याचे चित्र आहे. याबाबत मागील दोन दिवसांपासुन तालुक्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाकडुन कुठल्याच अधिकृत तथा खुल्या प्रतिक्रिया येताना दिसत नाहीत. तर सर्वसाधारण जनतेत मात्र याच विषयावर चवीने चर्चा रंगत असल्याचे दिसून येते. (BJP Officer Bearers Put Devendra Fadnavis Poster As Chief Minister In Aurangabad)
हेही वाचा: भाजपचा उद्धव ठाकरेंवर इतका राग का?, शिवसेना संपवण्याचे 'कट' कारस्थान
जो-तो टीव्ही, मोबाईल व इतर सोशल मीडियावर डोळे लावून बसल्याचे दिसते. दरम्यान, गुरुवारी (ता.२३) वरूड येथील भाजपचे युवा नेते तथा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर दांडगे यांच्या वतीने विठु माऊलीस आर्जव करून आषाढी एकादशीस पंढरपुरातील पांडुरंगाची पुजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते घडवून आणण्यासाठी आशीर्वाद देण्याबाबत साकडे घातल्याचे पोस्टर लावण्यात आले.
हेही वाचा: Maharashtra | बंडखोर शिवसेना आमदारांची हाॅटेलवारी जोरात, जनता मात्र वाऱ्यावर
या संदर्भातील एक भले मोठे पोस्टर थेट जालना महामार्गावरील केब्रिज चौकात लावण्यात आले आहे. हे पोस्टर सर्व वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे गुरूवारी दिसुन आले. या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत असुन जो-तो आपापल्या परीने याचा अर्थ काढत आहेत. दरम्यान, या पोस्टरमुळे आगामी राजकीय चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत विविध राजकीय पक्षांच्या वतीने पोस्टर वाॅर सुरू होण्याची शक्यता आहे.
Web Title: Bjp Officer Bearers Put Devendra Fadnavis Poster As Chief Minister In Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..