esakal | भाजपची निवडणूक तयारी, औरंगाबादेत मराठवाडास्तरीय बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप

भाजपची निवडणूक तयारी, औरंगाबादेत मराठवाडास्तरीय बैठक

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) आगामी निवडणुका व संघटन मजबुतीसाठी बुधवारी (ता.२१) औरंगाबाद जिमखाना क्लब येथे मराठवाडास्तरीय (Marathwada) बैठक घेण्यात आली. सकाळी दहा वाजेपासून सुरु झालेली बैठक दिवसभर चालली. यात जिल्हानिहाय आढावा घेत संघटनाची माहिती जाणून घेण्यात आली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्हानिहाय बैठका घेण्यात आल्या. बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे संघटन कशा प्रकारे सुरू आहे. यासह आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काय तयारी केली आहे, काय अडचणी आहेत, अशी विविध गोष्टींवर चर्चा करण्यात आली. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी शहराध्यक्ष संजय केणेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अमृता पालोदकर, सविता कुलकर्णी, माधूरी अदवंत, युवा मोर्चा, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.(bjp on election mode, marathwada level meeting held at aurangabad glp88)

हेही वाचा: सर्जाराजाच्या जोडीची ताटातूट, एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

यासह लातूर जिल्ह्यातील बैठकीत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilangekar) यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उस्मानाबाद येथील आमदार राणाजगजितसिंह पाटील यासह इतर पदाधिकारी, प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस हजेरी लावली. संघटन परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी पक्ष संघटनेच्या दृष्टीने विविध सूचना करण्यात आल्या.

loading image