esakal | सर्जाराजाच्या जोडीची ताटातूट, एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

सर्जाराजाच्या जोडीची ताटातूट, एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

sakal_logo
By
उद्धव दुवे

रोहिणा (जि.लातूर) : उजळंब (ता.चाकूर) (Chakur) येथील शेतकरी देवानंद बापुराव जाधव यांच्या शेतात आखाड्यावर बांधलेल्या बैलावर बुधवारी (ता.२१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीजवाहक तार तुटून अंगावर पडून विजेच्या धक्क्याने (Electric Shock) मृत्यू झाला. त्याची साधारण किंमत ८० हजार रुपये आहे. बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. सकाळपासून (Latur) भिज पाऊस पडतो आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीज उपकेंद्राच्या लाइनच्या खांबावर वीज कोसळल्याने पिन इन्सुलेटर फुटले आणि तार तुटून अपघात घडला. तीन वर्षे वयाचा आणि एक लाख तीस हजार रुपये किंमतीच्या बैलजोडीतील तो बैल होता. (bull died due to electric shock in chakur tahsil latur news glp88)

हेही वाचा: जनावरे चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, परभणीत कारवाई

या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवर प्रशासनातील पशुवैद्यकीय अधिकारी चाकूर, उजळंब सज्जाचे तलाठी, महावितरणाचे शाखा अभियंता यांना देण्यात आली. माहिती मिळताच महावितरणाचे शाखा अभियंता दर्पण गजभिये यांनी घटनास्थळी आपल्या ताफ्यासह धाव घेतली व पाहणी करुन तार जोडून वीजपुरवठा सुरळीत केला. दिवसभर पाऊस आणि त्यात बकरी ईदची सुटी असल्याने मृत बैलाचे शवविच्छेदन व पंचनामा उद्या गुरुवारी (ता.२२) होणार असल्याचे समजते.

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस, औंढ्यात पुरामुळे पुल तुटला

संकटे काही संपेनात

मृगात पाऊस चांगला पडला म्हणून आठ एकरमध्ये अडीच क्विंटल सोयाबीन पेरले. त्याच दिवशी संध्याकाळी मोठा पाऊस पडला आणि थापटी बसल्याने सोयाबीन वापलेच नाही. दुबार पेरणी करावी लागली. ७० हजार खर्च आला. चार महिन्यांपूर्वी एक लाख तीस हजार रुपये किंमतीची बैलजोडी विकत घेतली होती. आज वीजवाहक तार अंगावर पडल्याने जोडीतील उजवा बैल दगावला. जवळपास ८० हजारांचे नुकसान झाले आहे.

- देवानंद जाधव, शेतकरी

loading image