Chhatrapati Sambhajinagar Election Result bjp party winner celebration
sakal
छत्रपती संभाजीनगर - येथील महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वांत मोठे यश मिळविले असून, तब्बल ५७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे. बहुमतासाठी भाजपला एकाच नगरसेवकाची गरज आहे. भाजपच्या वादळात शिवसेना, ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळीस मिळाले आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाला बहुमत मिळाले आहे. ‘एमआयएम’ पक्ष तब्बल ३३ जागांवर विजय मिळवीत विरोधी पक्ष बनला आहे.