esakal | 'भाजप,शिवसेनेने राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करावी' | Harshwardhan Jadhav In Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार हर्षवर्धन जाधव

'भाजप,शिवसेनेने राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करावी'

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : कन्नड व सोयगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. आतापर्यंत राज्य सरकारने एसडीआरएफमधून पैसे दिलेले नाहीत. त्याचबरोबर एनडीआरएफकडून पैसे मिळालेले नाहीत.आता सध्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) त्यांचा डंका सगळीकडे पिटताना दिसतात, की राज्य सरकारने पिकविम्याचा हिस्सा न भरल्याने विमा देऊ शकत नाही. मुद्दा तो नाही या शब्दात माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांनी टीका केली आहे. प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत त्यांनी अतिवृष्टीबाबत राज्याबरोबर केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुम्ही राज्य सरकारवर ताशेरे ओढतायत. तुम्ही एकदा तुमच्याकडेही लक्ष दिले पाहिजे. तुम्ही काय करताय ?, असा सवाल (Rain) त्यानी कराडांना केला आहे. एनडीआरएफचा एकही अधिकारी अद्यापही आलेला नाही. तुमचा अद्यापही सर्वे नाही. किमान (Aurangabad) राज्य सरकारने सर्वे व पंचनामे तरी केलेत.

हेही वाचा: पोलिस दाम्पत्यात न्यायालयाच्या परिसरात वाद अन् झटापट

पण एनडीआरएफचा एकही अधिकारी कन्नड, सोयगाव तालुक्यात आलेला नाही. त्यामुळे भाजप, शिवसेनेने राजकारण करण्यापेक्षा दोघांनीही मिळून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकार शेतकरी मरायची वाट पाहतोय का? डाॅक्टर साहेब तुम्ही लोकांमध्ये फिरता. तुमचे अधिकारी पाठवा. तुम्ही देशाचे अर्थमंत्री असताना तुमचे जर एनडीआरएफचे अधिकारी येत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट नाही का? तुम्ही अशा परिस्थिती राज्य सरकारवर सर्व ढकलणार असाल तर हे योग्य नाही, असा सल्ला जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री कराडांना दिला. त्यामुळे दोन्ही सरकाराने तातडीने पैसे दिले पाहिजे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही पैसा आलेला नाही. जर माझ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर मी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये या सर्व राजकीय पक्षांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा: शिव्याशापाने विकास होत नाही,अशोक चव्हाण यांनी विरोधकांना सुनावले

loading image
go to top