esakal | शिव्याशापाने विकास होत नाही,अशोक चव्हाण यांनी विरोधकांना सुनावले | Ashok Chavan In Deglur
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण

शिव्याशापाने विकास होत नाही,अशोक चव्हाण यांनी विरोधकांना सुनावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगलूर (जि.नांदेड) : किमान समान कार्यक्रमानुसार तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ठरल्यानुसार पोटनिवडणुकीसाठी देगलूर-बिलोलीची जागा काँग्रेसकडे (Deglur Bypoll) आली. सर्वांच्या सहमतीने उमेदवार दिला. यात कुठे एकाधिकारशाही केली, हे मला तरी कळले नाही. ‘नांदेड माझे, मी नांदेडचा’ या धोरणाने आजपर्यंत वाटचाल राहिली असून एकमेकांना शिव्याशाप देण्याने विकास होत नसतो, तो माझा अजेंडाही नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांना सुनावले. काँग्रेसचे (Congress Party) उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी गुरुवारी (ता. सात) अर्ज भरला. त्यानंतर झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, आमदार श्‍यामसुंदर शिंदे, भुजंग पाटील, शीतलताई अंतापूरकर आदींसह जिल्ह्यातील आजी- माजी आमदार, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित (Nanded) होते.

हेही वाचा: राफेलचा पहिल्यांदाच वायुसेना दिवस परेडमध्ये समावेश; जग्वार, सुखोईही दाखवणार दम

अंतापूरकर परिवाराचे अश्रू हे भावनिक आहेत; पण विरोधक मगरीचे अश्रू ढाळून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मतदारांनी ओळखून जितेशच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. मतदारसंघाचे पालकत्व घेण्यास तयार आहे. अंतापूरकर परिवाराला काँग्रेस वाऱ्यावर सोडणार नाही, याची हमी देतो. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर या मतदारसंघात शंभर कोटींची कामे मंजूर केली आहेत. अंतापूरकरानी पाहिलेले विकासाचे स्वप्न भविष्यात पूर्ण करीन, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

कार्यकर्ता आघाडीसोबत - कदम
देश भांडवलशाहीच्या घशात घालू पाहणाऱ्या सत्तापिपासू भाजपाला या पोटनिवडणुकीत धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा स्थानिक प्रत्येक कार्यकर्ता तनमनधनाने महाविकास आघाडीसोबत राहील, याची हमी कमलकिशोर कदम यांनी दिली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख जाधव यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर टीका केली. राज्यमंत्री सत्तार, बसवराज पाटील, डॉ. यशपाल भिंगे आदींची भाषणे झाली. आमदार अमर राजूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा: Corona Update: राज्यात आज 2,681 कोरोना रुग्णांची नोंद

loading image
go to top