औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्सची फाडाफाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Shivsena activists tear down each others banners in aurangabad bjp jal aakrosh morcha

औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्सची फाडाफाडी

औरंगाबाद : पाणिटंचाईच्या मुद्यावर आज शहरात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणार सहभाग नोंदवला. दरम्यान या मोर्चाच्या वेळी शहरात लावण्यात आलेल्य़ा बॅनर्सवरून शिवसेना-भाजपमध्ये एक नवा वाद सुरू झाला आहे. (bjp jal aakrosh morcha)

भाजप शिवसेना वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे, शिवसेनेकडून आम्ही पाणीपट्टी आर्ध्यावर आणलीय तुम्ही गॅस सिलेंडरचे भाव आर्ध्यावर आणणार करणार काय? असा सवाल शिवसेनेकडून या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला होता. तर भाजपने शहरात जलआक्रोश मोर्चाचे बॅनर लावले आहेत, याच्याच बाजूलाच शिवसेनेने गॅस दरवाढीवरून प्रश्न विचारत हे बॅनर लावले होते, ते बॅनर अज्ञात भाजप कार्यकर्त्यांनी फाडल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : सत्ताबदल नाही, तर व्यवस्थाबदलासाठी मोर्चा - फडणवीस

सेना आणि भाजप यांच्यात बॅनर युध्द सुरु आहे. महात्मा फुले चौक ते सांस्कृतिक मंडळापर्यंत मोर्चाच्या मार्गावर असलेले बॅनर अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले आहेत. दरम्यान यापुर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपचे बॅनर फाडले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान भाजपकडून बॅनर फाडण्यात आल्यानंतर यावर शिवसेनेची भूमिका काय असेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: खरंच औरंगजेबाने एका राणीसाठी 'काशी विश्वेश्वराचं' मंदिर पाडलं होतं?

Web Title: Bjp Shivsena Activists Tear Down Each Others Banners In Aurangabad Bjp Jal Aakrosh Morcha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top