Aurangabad : भाजपचे लक्ष्य महापौर अन् खासदार!

शिरीष बोराळकर ; वॉर्डांतील समस्या सोडविण्यासाठी ‘टास्क फोर्स’
Aurangabad
Aurangabad sakal

औरंगाबाद : देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या भाजपची शहर जिल्ह्यातही मोठी ताकत वाढली आहे. यामुळे आगामी काळात महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी स्विकारत महापालिका ताब्यात घेत भाजपचा महापौर आणि लोकसभेचा खासदारही ‘कमळ’ चिन्हावरच निवडणून आणणार, हा आमचा निर्धार असून, त्याच पध्दतीने काम करणार असल्याचे नवनियुक्त शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी शुक्रवारी ‘सकाळ’ला सांगितले.

पदभार स्वीकारल्यानंतर बोराळकरांनी पहिल्याच दिवशी आंदोलनाने त्यांच्या कामाची सुरवात केली. श्री. बोराळकर म्हणाले, की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी मला शहराध्यक्षपदाची संधी दिली. त्या संधीचे सोने करेल. पक्ष संघटनाबरोबर आम्ही वार्डा-वार्डातील समस्या आणि त्या सोडविण्यासाठी काय करावे यासंदर्भात एक टास्क फोर्स नेमणार आहोत. येत्या पंधरा दिवसात याचे नियोजन असेल. याद्वारे मतदारांच्या बैठका घेत त्यांच्या समस्यांसह महापालिकेच्या अनुषंगाने सर्वच विषयांना हात घालून त्या मार्गी लावणार आहोत.

निष्ठावंतांसह नव्या चेहऱ्यांनी संधी

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत निष्ठावंतांचा पहिला विचार केला जाणार आहे. यासह नवे चेहरे देण्याचे पक्षाचे धोरण आहे. तिकिट वाटपाचा निर्णय हा पक्षाची निवड समिती घेणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मित्र पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी पक्षाने जाहिर केलेल्या उमेदवारांच्या पाठिशी, माझ्या पदवीधर निवडणुकीचा अनुभव आणि नेटवर्क उभे करणार असल्याचेही बोराळकरांनी सांगितले.

शिवसैनिकही संपर्कात

शहराध्यक्षपद मिळल्यानंतर मला हजारो फोन आले. त्यात तीनशे ते साडेतीनशे फोन शिवसैनिकांचे होते. विशेष म्हणजे, त्यात काही मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. मी शहराध्यक्ष झाल्यांचा त्यांना आनंद झाला. आगामी काळात हे मोठे नेते हाती ‘कमळ’ घेतील, असा दावाही बोराळकर यांनी केला. यासह उद्योग आणि खेळाडुचे प्रश्‍न सोडविणार असल्याचेही बोराळकरांनी सांगितले.

शहरात जंगी स्वागत

शहाराध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शिरीष बोराळकर हे गुरुवारी (ता.दहा) औरंगाबादेत आले असता शहर कार्यकारिणीतर्फे त्यांचा नगर नाका रोडवरील माता मंदिर ते उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढत जंगी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. यात बसवराज मंगरुळे, भगवान घडामोडे, अनिल मकरिये, राजेश मेहता, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, राजू शिंदे, प्रदीप पाटील, दिपक ढाकणे, दिलीप थोरात, विकास कुलकर्णी, डॉ. राम बुधवंत, प्रशांत देसरडा, रामेश्वर भादवे, हेमंत खेडकर, सविता कुलकर्णी, माधुरी आदवंत, अमृता पालोदकर, हर्षवर्धन कराड, अरविंद डोणगावकर, जालिंदर शेंडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com